चाणक्य नीतीनुसार, दारिद्र्य आणतात या 4 सवयी

मंगळवार, 5 जानेवारी 2021 (14:51 IST)
चाणक्य नीतिशास्त्रात आचार्य चाणक्यानुसार ज्या लोकांमध्ये चार प्रकारच्या विशिष्ट घाणेरड्या सवयी असतात त्यांच्या वर कधीही आई लक्ष्मी कृपा करत नसतात. असे लोक श्रीमंत जरी असतात तरी ही ते लवकर गरीब होतात आणि ते नेहमी भौतिक सुखसोयींचा अभावामध्ये जगतात. या साठी आर्थिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी या चार सवयींना सोडून द्यायला पाहिजे.
 
1 खरे मित्र आणि शुभेच्छुकांना विसरू नये- 
जे लोक खरे मित्र आणि आपल्या शुभेच्छुकांना विसरतात. असे लोक कठीण काळात एकटे आणि असहाय राहतात. म्हणून नेहमी आपल्या खऱ्या मित्रांचा आणि शुभेच्छुकांचा साथ कधीही सोडू नये. गरज असल्यास त्यांची मदत करावी. चाणक्य नीतीनुसार जे लोक नेहमी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन चालतात, आई लक्ष्मी त्यांच्या वर नेहमी आनंदी राहते. या मुळे घरात पैशाची कमतरता होत नाही.
 
2 घाण दूर करा - 
जे लोक घाणरेडे राहतात अस्वच्छ कपडे घालतात किंवा आपल्या सभोवतालीचे वातावरण घाण ठेवतात सकाळी दात स्वच्छ करीत नाही. अशा लोकांवर आई लक्ष्मी कधी प्रसन्न होत नाही. असे लोक नेहमीच दारिद्र्याचे जीवन जगतात. म्हणून ह्या वाईट सवयींचा त्याग करावा. या शिवाय आपल्या घरात भांडणे करू नये.
 
3 जे लोक वाईट शब्द वापरतात-
जे लोक वाईट शब्द वापरतात त्यांच्या वर आई लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. म्हणून नेहमी गोड बोलावं. गोड बोलण्याची सवय चांगली आहे कडू बोलण्याची सवय त्वरित काढून द्यावी. कडू बोलण्यामुळे एखाद्याचे नाते बिघडू शकतात आणि तो दरिद्री देखील होतो.
 
4 सकाळी उशिरा पर्यंत झोपू नका -
सूर्योदयानंतर कधीही झोपू नये. चाणक्यानुसार, जे लोक संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात ते नेहमी दरिद्री राहतात. शास्त्रात देखील संध्याकाळी झोपणे निषिद्ध आहे. कारण संध्याकाळ देवी-देवांची पूजेचा काळ आहे. या काळात झोपणाऱ्यांवर देवी आई लक्ष्मी कधीही कृपा करत नाही. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती