सुधाच्या मुलीचं लग्न ठरलं. मनासारखं स्थळ मिळालं म्हणून घरातले सगळे खूशच होते. पण आता तिला खूप दडपण आलं होतं. कारण तिच्या विहीणबाई नमिताताई आतिशय शिस्तबद्ध बाई होती. कामाचं नियोजन नेटकेपणाने आणि सगळे न विसरता व्यवस्थित करणारी वाटली. सुधा हे सगळं आम्हा मैत्रिणींना सांगत होती. आमच मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आशाताई थोडय़ा वाने मोठय़ा, अनुभवाने परिपक्व आणि त्यांचं बोलणंही तितकंच प्रेमळ. त्या सुधाला म्हणाल्या, सुधा अगं कसली काळजी करतेस एवढी. हाताशी आता डायरी पेन ठेव आणि रोज सकाळी बसून त्या त्या दिवसाचं कामाचं नियोजन कर, पण आधी सर्व कामांची यादी कर. आधी कोणती काङ्के कराची ते ठरव. आशाताई सांगत होत आणि तंचा अनुभव सगळंनाच पुरे पडणारा होता.
आशाताई म्हणाल, अगं, तुझ्या मुलीचं लग्न म्हणजे शुभकार्य. या कार्याचा शुभारंभ दिवस पाहून करावा. या दिवशी देवापुढे विडा-दक्षिणा ठेवून नमस्कार कर. घरातल्या सासु-सासर्यांना त्या दिवशी आठवणीने बोलव. त्यांचे आशीर्वाद हवेच हवे. अगं, तू नशीबवान आहेस. तुला आईवडील, सासु-सासरे आहेत. नाहीतर घरातल्या वडीलधार्यांना नमस्कार करुन पूजेला या, असं गुरूजी सांगतात तेव्हा नमस्कार करायला वडीलधारे पाय नसतात आणि आपणास कळते की, आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात द्यायला हातही नसतो. असो, पण सासु-सासर्यांना विसरू नकोस एवढंच मला सांगायचं.
नंतर एकदिवस मुहूर्ताचा ठरव. आई-वडील, सासु-सासरे असलेल्या पाच सवाष्णींना आवर्जून आमंत्रण दे. पण आम्हा मैत्रिणींना सुद्धा बोलव. त्या दिवशी हळद घालून थोडीशी कणीक भिजव. कारण मुहूर्तादिवशी त्याचा गणपती करायचा असतो. त्याच्या पूजेसाठी माळा वस्त्र, लाल फूल, दूर्वा, अक्षता, विडा-दक्षिणा, नैवेद्याला गूळखोबरं अशी छान पूजेची तयारी कर. आणि औक्षणाचीही तयारी कर. सकाळी गव्हलंसाठी दुधात रवा भिजवायचा आहे, हे विसरू नकोस. पूर्वी, सुपारी हळकुंड पाटय़ावर फोडून ठेवत असत. आता काही त्याची इतकी गरज नाही.
WD
सगळं ऐकून सुधाला खूपच धीर आला. आणि आशाताई पुढे म्हणाल्या, एखाद्या रविवारी मुहूर्ताचे काम म्हणून पापडाचे पीठ भिजव. सगळ मिळून कामाचा फडशा पाडून टाकू या. आणि खरेदीला जाशील तेव्हा प्रथम गपपतीचे चित्र, तुझ्या कुलदेवतेचे चित्र, रंगीत रांगोळी, तोरण, सुपारीचं सामान हे सगळं खरेदी करून टाकू. सगळं मुहूर्ताचं झालं की, आम्हा मैत्रिणींना गरमागरम पोहे आणि छान चहा कर म्हणजे झालं.
सगळं ऐकून सुधाला खूप बरं वाटलं. तिच्या लक्षात आलं. आशाताईंच अनुभवाचा तिला किती उपयोग होणार आहे. नाहीतर एकटीचा जीव दडपून गेला होता. बरं, आताच्या काळात सगळ्या बहिणी काय, नंदा काय, नोकरीच्या असतात. मग पूर्वीसारखं लग्नाच्या तायारीला महिना महिना येऊन तरी कोण राहणार? अशावेळी मैत्रिणीच खर्या उपोगी ठरतात. सुधाला आपल्याला जवळच्या मदत करणार्या मैत्रिणींचा ग्रुप असल्यानं बरं वाटलं.
मैत्रिणी नोकरी करणार्या असल्या तरी शनिवार-रविवार वेळ देऊ शकणार्या होत्या. सगळ एकत्र येऊन कोणतेही काम पूर्ण करत असायच्या. त्यामुळे मैत्रिणी हव्याच हव्या. आता एकदम सुधा रिलॅक्सच झाली होती हे खरं.