Ganesh Chaturthi 2020: या शुभ मुहूर्तात करा श्रीगणेश पूजा

गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (12:34 IST)
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट रोजी असून सनातन धर्मात गणपतीच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे. भगवान गणेशाचा जन्म दुपारच्या मध्यभागी या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला होता, म्हणूनच या तारखेला महक म्हणूनही ओळखले जाते. गजाननाला सुख-समृद्धि प्रदाता मानले गेले आहे. शास्त्रांप्रमाणे गणपती संकट, कष्ट, दारिद्रय आणि आजरांपासून मुक्ती प्रदान करणार देव आहे.
 
गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणपतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे.
 
गणेश चतुर्थी 2020: शुभ मुहूर्त
गणेश पूजनासाठी मध्याह्न मुहूर्त : 11:05:43 ते 13:41:30 पर्यंत
अवधि : 2 तास 35 मिनिटं
 
चंद्रदर्शन निषेध: 09:07:00 ते 21:25:00 पर्यंत
 
गणेश चतुर्थी पूजन विधि-
सकाळी उठून स्नान केल्यावर तांबा, सोनं, चांदी किंवा मातीच्या गणपतीची मूर्ती प्रतिष्ठित करावी.
गणपतीला वस्त्र, दूर्वा, शेंदूर अर्पित करावे.
गणपतीला 21 दूर्वा दल अर्पित करुन 21 मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा. 
5 मोदक किंवा लाडू देवाला अर्पित करुन शेष गरीबांना प्रसाद म्हणून वाटावे.
संध्याकाळी देवाची विधि-विधानाने पूजन करावे. 
गणेश चतुर्थीला कथा करावी. आरती करावी. अर्थवशीर्ष पाठ करावा.
या दिवशी गणपतीची सिद्धीविनायक रुपात पूजा करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती