ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी एक संयुक्त निवेदन शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, 16.07.24 रोजी एका निरोगी बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकाने दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत.
ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी नुकतेच मॅटर्निटी फोटोशूटसाठी पोज दिली. यासोबत अभिनेत्रीने लिहिले होते की, असे शुद्ध प्रेम जगात प्रकाशाच्या किरणांशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझा साथीदार बनण्यासाठी अली फजलचे आभार.
ऋचा चड्ढाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. अली फजल पुन्हा एकदा 'मिर्झापूर 3' या वेबसीरिजमध्ये गुड्डू भैय्याच्या भूमिकेत दिसणार आहे.