FIFA WC: आजपासून शेवटच्या आठ सामन्यांना सुरुवात

शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (17:07 IST)
कतार फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. यादरम्यान चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जाणार असून आठ संघ एकमेकांना आव्हान देतील. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले आठही संघ बलाढ्य आहेत आणि कुणालाही कमी लेखता येणार नाही. 
 
क्रोएशियाचा मिडफिल्डर इव्हान पेरिसिक, ब्राझीलचा फॉरवर्ड नेमार, नेदरलँडचा फॉरवर्ड कोडी गकपो, अर्जेंटिनाचा फॉरवर्ड लिओनेल मेस्सी, मोरोक्कोचा हाकिम झिएच, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो, इंग्लंडचा हॅरी केन आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे आपापल्या संघात जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करतील. 
 
उपांत्यपूर्व फेरी सामना वेळा पत्रक -
 
मैच तारीख (दिवस) वेळ स्टेडियम
क्रोएशिया vs ब्राजील 9 दिसंबर शुक्रवार रात्री 8:30 वाजता एजुकेशन सिटी
नीदरलैंड vs अर्जेंटीना 10 दिसंबर शनिवार रात्री 12:30 वाजता लुसैल
पुर्तगाल vs मोरक्को 10 दिसंबर शनिवार रात्री 8:30 वाजता अल थुमामा
इंग्लैंड vs फ्रांस 11 दिसंबर रविवार रात्री 12:30 वाजता अल बायत
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती