पुराणामध्ये या 5 जणांना वडीलांचा मान देण्यात आला आहे
1. जनिता चोपनेता च, यस्तु विद्यां प्रयच्छति।
अन्नदाता भयत्राता, पंचैते पितरः स्मृताः॥
या 5 जणांना वडील म्हटले आहे. जन्म देणारा, मुंज करणारा, ज्ञान देणारा, अन्न दाता, आणि भयत्राता- चाणक्य नीती.
थोरला भाऊ, वडील आणि ज्ञान देणारा गुरु हे तिन्ही धर्म मार्गावर अटळ राहणाऱ्या पुरुषांसाठी वडीलधारी मानले आहे. - वाल्मिकी (रामायण, किष्किंधा कांड).