खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी.माझा आवडता खेळ फुटबॉल हा आहे. फुटबॉल ला जगातील सर्वात मनोरंजक खेळामधून एक मानले जाते. हा खेळ विविध देशातील युवकांद्वारे मोठ्या आवडीने खेळला जातो. फुटबॉल व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक रूपाने बळकट करतो. हा खेळ मनोरंजन, आनंद व शरीराचा व्यायाम व्हावा या हेतूने खेळला जातो.
इतिहास-
हा खेळ चिनी खेळ सुजू सारखा आहे. या पासूनच फुटबॉल चा खेळ विकसित झाला. असे म्हणतात की पूर्वी जपानध्ये असुका वंशाचे लोक हा खेळ खेळायचे नंतर हा खेळ इसवीसन 1586 मध्ये जॉन डेविस नावाच्या एका जहाज कप्तान द्वारे हा खेळ ग्रीनलँड मध्ये खेळला गेला. त्यानंतर हा खेळ जगभरात प्रख्यात झाला. भारतात या खेळाला लोकप्रिय नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांनी केले. ह्यांना फुटबॉल चे जनक असे देखील म्हणतात. सर्वाधिकारी यांनी सर्वप्रथम हा खेळ आपल्या मित्रांसह खेळला नंतर त्यांनी हा खेळ अनेक शाळांमध्ये खेळवायला सुरु केले.
सुरुवातीच्या काळात फुटबॉल प्राण्यांच्या मूत्राशया पासून बनवण्यात यायचा. परंतु नंतरच्या काळात यात प्राण्यांची चामडी वापरली जाऊ लागली, ज्यामुळे फुटबॉलचा आकार निश्चित झाला. या खेळात वापरला जाणारा बॉल मजबूत रबर पासून बनवतात. फुटबॉलचा परीघ 58 सेंटीमीटर पासून 61 सेंटीमीटर पर्यंत असतो. या मध्ये हवा भरली जाते. हा खेळ खेळतांना बॉल वरच लक्ष ठेवावे लागते. हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. या खेळाचे मैदान फुटबॉल चे मैदान 100 मी, 64 मी पासून तर 110 मी, 75 मी पर्यंत चे आयताकृती असते. दोन्ही बाजूला नेट ने बनवलेले गोल पोस्ट असतात. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोलपोस्ट मध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असते. या खेळासाठी काही नियम असतात ज्यांना पाळावे लागतात. या खेळाला पायाने खेळले जाते. या खेळात फुटबॉल ला हात लावण्याची परवानगी नसते. ठराविक अंतर राखून गोल करायचे असते. हा संपूर्ण खेळ 90 मिनिटाचा असतो. 45 मिनिटांवर एक 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. खेळा दरम्यान खेळाडू ला दुखापत झाल्यास 'इंजरी टाइम 'म्हणून काहीवेळा साठी खेळ थांबविला जातो.