World Cup मध्ये भरताची मॅच रद्द झाल्यावर फॅन्सचा फुटला राग, त्यावर अमिताभ यांनी केले मजेदार Tweet

शुक्रवार, 14 जून 2019 (14:31 IST)
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच अमिताभ यांनी क्रिकेट वर्ल्ड कपाबद्दल एक मजेदार ट्विट देखील केलं आहे, हे ट्विट चाहत्यांना खूप आवडतं आहे. 
 
प्रत्यक्षात, 13 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथे सामना खेळला जाणार होता, पण पावसामुळे सामना रद्द झाला. फॅन्समध्ये या सामन्याबद्दल खूप उत्साह होता. तथापि पुन्हा एकदा पावसामुळे हा सामना रद्द झाला. यामुळे सोशल मीडियावर त्यांचा राग दिसून आला आहे. 
 
अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटरवर सामन्याबद्दल टिप्पणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी एका वापरकर्त्याच्या ट्विटला रिट्वीट करताना थट्टेत लिहिले, '2019 ची वर्ल्ड कप स्पर्धा भारतात करवून घ्या... आम्हाला पावसाची गरज आहे.' जवळजवळ सर्व विषयांवर ट्विट करणारे अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हा ट्विट सोशल मीडियावर खूप लवकरच व्हायरल होत आहे. अमिताभ यांच्या या ट्विटवर फॅन्स सतत टिप्पण्या करत आहेत.
 
भारत-न्यूझीलंड हा सामना पावसात वाया गेल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि जेव्हा की भारतीय संघ 5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा पुढला सामना आता पाकिस्थानाविरुद्ध 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती