नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:12 IST)
राज्यात शुक्रवारी  देखील नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५,०३,०५० वर पोहोचली आहे. तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
 
राज्यात शुक्रवारी  ६,१९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ८,२४१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १२७कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.६२ टक्के एवढा आहे.
 
दरम्यान, सध्या राज्यातील २५,२९,४६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२,४११ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १,२५, ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
पुणे शहरात २८४ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू
 
पुणे शहरात दिवसभरात २८४ नवे रुग्ण आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पिंपरी-चिंचवड शहरात  १७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि ४ जणांचा मृत्यू झाला. तर, १२१ जण करोनामुक्त झाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती