रेल्वे प्रवाशांना मिळणार तिकिटाचा शंभर टक्के परतावा : लॉकडाउन वाढल्याने रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (13:52 IST)
राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन 14 एप्रिल नंतर टप्पटप्प्याने रेल्वे सुरू होईल या आशेने रेल्वे मंत्रालयाने ठरावीक मार्गावरील प्रवाशांची ऑनलाइन बुकिंग घेतले अनेक प्रवाशांनी टिकीट बुकिंग केले. मात्र, आता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढल्याने बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना तिकिटाचा शंभर टक्के परतावा दिला जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी ए्रस्प्रेसरेल्वे गाड्याची ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल झाले होते. तत्पूर्वी लॉकडाउनची मुदत वाढल्यास तिकिटाचा परतावा मिळेल अशा ऑनलाइन सूचनाही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, गावी जाण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी जाण्याच्या निमित्ताने प्रवाशांनी तिकीट बुकिंग केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याममुळे आता रेल्वेचे प्रवासी सेवा 3 मेपर्यंत बंदच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता प्रवाशांनी ऑनलाइन तिकिटे रद्द करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तिकिटे रद्द केल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत.