राज्यातील 'या' जिल्ह्यातही ओमिक्रोनची एंट्री

रविवार, 12 डिसेंबर 2021 (21:04 IST)
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन आता हळूहळू राज्यभरात पसरत चालला आहे. मुंबई, पुणे नंतर ओमिक्रॉनने नागपूरमध्ये प्रवेश केला आहे. नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.
 
हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जीनोमसिक्वेन्सीसाठी रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
 
या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोविड चाचणी घेण्यात आली असताना त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. 
 
दरम्यान, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 18 वर पोहोचवली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रोनचा उगम झालेल्या देशातून आलेअसल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती