ट्रॅव्हल्स, टॅक्सी आणि इतर खासगी वाहनांसाठी...
नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशात टॅक्सी, खासगी चारचाकी अथवा बसचालकांना नियमांची सक्ती करण्यात आली आहे. कोविड नियमांचं (Covid appropriate behaviour) उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास ड्रायव्हर, हेल्पर, कंडक्टर यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जर बसमध्ये नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आल्यास बस मालकाला 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
नव्या नियमावलीनुसार...
- कोणत्याही कार्यक्रमात (सांस्कृतिक, सोहळा, चित्रपट, नाटक) सहभागी होणाऱ्या नागरिकांनी, आयोजकांने, सेवा पुरवणाऱ्याने आणि इतर उपस्थितांनी (खेळाडू, सिनेकलाकार) यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक.
- दुकानं, मॉल्स, आस्थापना, इव्हेंटचं ठिकाण आणि सांस्कृतिक कार्यक्रम जिथे लोक येणार आहेत अशा ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचारी, कामगारांचं पूर्ण लसीकरण झालेलं असावं. त्याचबरोबर याठिकाणी भेट देणारे, ग्राहक यांनीही लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.
-युनिव्हर्सल पास हा लसीकरण झालेलं असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल. युनिव्हर्सल पास नसल्यास कोविडवरील दोन डोस घेतलेले असल्याचं प्रमाणपत्र आणि वैध ओळखपत्र (आधार, मतदान कार्ड) असणं अनिवार्य असेल.
- 18 वर्षाखालील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सरकारी अथवा शाळेनं दिलेलं ओळखपत्र ग्राह्य धरलं जाईल. जे वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ शकत नाहीत, असे नागरिक डॉक्टरांनी दिलेलं प्रमाणपत्र दाखवून शकतात.