Omicron : महाराष्ट्रात गुरुवारी विदेशातून आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह

शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (12:42 IST)
महाराष्ट्रात गेल्याकाही दिवसांत परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आलेत.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झालीये.
 
कोरोना पॅाझिटिव्ह प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.
 
यातील 12 नमुने पुण्याच्या NIV मध्ये तर 16 नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणी पाठवण्यात आले आहेत.
 
मुंबंई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॅा. मंगला गोमारे सांगतात, "2 डिसेंबरला एअरपोर्टवर 485 लोकांची चाचणी करण्यात आली. यात 9 प्रवासी कोरोना पॅाझिटिव्ह असल्याचं आढळून आलं."
 
महाराष्ट्र सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलीये.
 
या तपासणीत आत्यापर्यंत 9 प्रवासी पॅाझिटिव्ह सापडले आहेत. यातील एक प्रवासी दक्षिण अफ्रिका तर तीन प्रवासी लंडनवरून आले होते.
 
या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आली नाहीयेत अशी माहिती अघिकाऱ्यांनी दिलीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती