मुंबईत गेले तीन दिवस कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असताना बुधवारी पुन्हा एकदा मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. मुंबईत बुधवारी 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे.