अहमदनगरमध्ये 1 महिन्यात 10 हजार लहान मुलांना कोरोना

बुधवार, 2 जून 2021 (20:24 IST)
महाराष्ट्रात कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव कायम असून अहमदनगर जिल्ह्यात केवळ मे महिन्यात 9 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 
 
मात्र महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
 
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.  त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. 
 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटीत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या आढळली. एप्रिल महिन्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये 80 हजार तर मे महिन्यात 87 हजार कोरोनाबाधित आढळले. या बाधितांत मुलांचीही संख्या मोठी आढळली आहे. मे महिन्यात 87 हजार रुग्णांपैकी दहा हजार मुले बाधित आढळली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत साडे अकारा टक्के आहे. 
 
मे महिन्यात बाधित मुलांचे वर्गीकरण
0-1 वर्षे-89
1-10 वर्षे - 3081
11-18 वर्षे- 6855
एकूण- 10,025
 
यावरून हे दिसून येते की 18 वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती