NEET Preparation Tips: यंदा NEET UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. NEET परीक्षेद्वारे 607 वैद्यकीय, 313 दंत, 914 आयुष, 47 बीव्हीएससी आणि एएचमहाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला जातो. NEET UG परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. भारतातील NEET UG परीक्षेसाठी 543 शहरांमध्ये केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय देशाबाहेरील 14 शहरांमध्ये परीक्षेसाठी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.आता परीक्षेला फक्त एक महिना उरला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ताण आणि चिंता वाढत आहे. या साठी काही टिप्स सांगत आहोत जेणे करून विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल चला तर जाणून घेऊ या .
यंदाच्या NEET परीक्षेच्या पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर परीक्षेत 200 प्रश्न दिले जाणार आहेत. उमेदवारांना 200 पैकी 180 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. परीक्षेत येणारा प्रत्येक विषय विभाग अ आणि विभाग ब अशा दोन भागात विभागला जातो. विभाग A मध्ये 35 प्रश्न असतील आणि विभाग B मध्ये 15 प्रश्न असतील. तसेच, परीक्षेच्या गुणांकन योजनेनुसार, प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी परीक्षार्थींना 4 गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.