जेटकिंग इन्फोट्रेनने सर्वात तरुण हॅकर ओंकार सोनावणे यांच्यासोबत सायबर सिक्युरिटी कोर्स सुरू केला

बुधवार, 15 मार्च 2023 (09:06 IST)
२०२१ मध्ये, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांमुळे जगभरात $६ ट्रिलियनचे नुकसान झाले आहे. २०२२ मध्ये, मानवी हल्ल्यांमुळे ६ अब्जाहून अधिक लोकांवर परिणाम होण्याची अपेक्षा होती.
गेल्या काही वर्षांत, सायबर सुरक्षा रोजगाराच्या गरजांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३ पर्यंत, सायबसुरक्षा क्षेत्रात १ दशलक्षाहून अधिक खुल्या जागा असतील, परंतु ४ पेक्षा कमी लोकांना सायबर सुरक्षा प्रशिक्षण मिळालेले असेल. सायबर सुरक्षेचे क्षेत्र सतत विस्तारत आहे. हा आलेख २०२३ आणि २०२५ मध्ये, अनुक्रमे ११% आणि २०% ने वाढण्याचा अंदाज आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, जेटकिंग इन्फोट्रेनने, भारतातील सर्वात तरुण एथिकल हॅकर, ओंकार सोनावणे यांच्यासह, व्यावसायिकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नवीन सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
 
सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि जागरूकता वाढवण्याचे काम करणारे हर्ष भारवानी आणि सायबर सिक्युरिटी, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, नेटवर्क सिक्युरिटी आणि डेटा संरक्षण या विषयात निपुण असलेले श्री ओंकार सोनवणे यांचा हा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांना सायबर हल्ल्यांपासून संस्थांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी सहा महिन्यांचा असेल, ज्यामध्ये ऑनलाइन लेक्चर्स, हँड-ऑन एक्सरसाइज आणि वास्तविक-जगातील उदाहरणे यांचा समावेश आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सामग्रीची संपूर्ण माहिती असेल.
 
"ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात प्रगत अभ्यासक्रम प्रदान करण्यात आणि त्यामध्ये प्रगती करण्यात जेटकिंग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जेटकिंग इन्फोट्रेनने आतापर्यंत ६-७ दशकांच्या कालावधीत १० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि व्यावसायिकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिले आहे. आणि मार्केटमध्‍ये ८५-९०% प्लेसमेंटचे गुणोत्तर राहिले आहे. भारतातील सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आम्ही सायबर सिक्युरिटी जगतातील प्रसिद्ध नाव ओंकार सोनावणे याच्याशी भागीदारी केली. एक यशस्वी तरुण असल्याने, आम्हाला माहित होते की तो या कोर्स साठी योग्य असेल.आणि ह्या कोर्सला उद्योग जगत मोठ्या प्रमाणावर सहज स्वीकारेल. असे मत " जेटकिंग इन्फोट्रेनचे सीईओ आणि एमडी हर्ष भारवानी यांनी मांडले.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती