बॉलिवूड ललना सनी लिओनने सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, सोने वापरावर मर्यादा असे अनेक धडाकेबाज व खळबळजनक निर्णय घेऊन विरोधकांना पळता भुई थोडे करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे.
भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणार्या सेलिब्रेटींमध्ये सनी लिनोनने याहू इंडियाने केलेल्या नव्या सर्वेक्षणात आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला मागे टाक नंबर एकचे स्थान पटकावले आहे. या तिन्ही भारतीयांनी मागील पाच वर्षांपासून आपले स्थान कायम ठेवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.