शाहरुख परत बनेल बाबा, चवथ्या बळाचे नावसुद्धा ठरवले

मंगळवार, 23 जानेवारी 2018 (13:42 IST)
पर्फेक्ट वडिलांची भूमिका चांगल्या प्रकारे निभावणारा शाहरुख खानला मुलं फारच आवडतात. आर्यन आणि सुहानानंतर त्यांनी एका मुलासाठी सेरोगेसीची मदत घेतली आणि त्यांचा तिसरा मुलगा अबराम झाला. पण अद्यापही शाहरुखचे मन काही भरलेले नाही आहे आणि तो चवथ्या मुलाची प्लानिंग करत आहे.  
 
शाहरुख खान नेहमीपासूनच आपल्या ह्यूमरमुळे ओळखला जातो. मीडिया आणि   चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तर तो फार मसालेदार देतो. यामुळे मीडियाला तर मजा येतोच, तसेच त्याचे चाहते त्याच्या ह्यूमरची तारीफ करतात. नुकतेच एक अजून मुलाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. 
 
त्याचा एक नवीन शो टेड टॉक्स इंडिया नवीन विचारात त्याने या गोष्टीची चर्चा केली होती. त्याला शूटिंगदरम्यान आकांक्षा हे नाव घ्यायचे होते, पण शाहरुख याला योग्य प्रकारे बोलू शकत नव्हता आणि सारखे सारखे रीटेक द्यावे लागत होते. अशात शाहरुख ने वातावरण मस्तीचे करण्यासाठी म्हणाला की हे नाव बोलताना मी फार अटकत आहे आणि मला एम्बेरेसिंग जाणवत आहे कारण असे माझ्यासोबत कधी  होत नाही. मला असे वाटत आहे की माझं चवथं बाळ होईल आणि त्याचे नाव मी आकांक्षा ठेवीन.  
 
शाहरुखची ही बाब सर्वांना फार आवडली आणि आग सारखी सर्वत्र पसरली. पण लवकरच कळले की हा फक्त मजाक होता.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती