शाहरुखची ‘सर्कस’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दूरदर्शनवर १९८० नंतरच्या काही मालिकांमध्ये शाहरुख झळकला होता. त्यावेळी त्याने ‘सर्कस’ आणि ‘फौजी’ या दोन मालिकांमध्ये काम केले होते. आता  दूरदर्शनवर १९८९ साली दाखविण्यात आलेली ‘सर्कस’ ही मालिका आता पुन्हा दाखविण्यात येणार आहे.

डीडी नॅशनलने ‘सर्कस’ ही मालिका पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून रात्री ८ वाजता ही मालिका तुम्हाला डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा