राकेश सावंतला तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून जामीनपात्र वॉरंट अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यावेळी राकेशला पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र पैसे परत न केल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याला ओशिवरा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राकेशने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्याला पोलिसांनी अटक केली आणि नंतर जामीन मिळाला. आपली आणि बहीण राखी सावंतची प्रतिमा डागाळण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचे राकेशने आपल्या वक्तव्यात म्हटले होते.