महादेवाच्या रूपात राजकुमार राव

राजकुमार रावने अलीकडेच बहन होगी तेरी च्या सेटवर महादेवाच्या रूपात येऊन सर्वांना चकित केले. या सिनेमात तो श्रुती हसनसोबत काम करत आहे. सिनेमासाठी त्याने आपले शरीर निळ्या रंगाने रंगवले आणि महादेवासारखा शृंगार केला.
 
आपल्या भूमिकेत खूश राजकुमार म्हणाला माझ्या भूमिकेतील नाव गट्टू आहे. तो एका जागरण मंडळीचा भाग आहे ज्याची मालक श्रुती आहे. हे त्याचं पार्ट टाइम काम आहे. ही भूमिका खूपच खास आहे.
 
रावला या देखाव्यासाठी पूर्ण दोन तास तयार व्हावं लागलं. राजकुमार लहानपणीची आठवण काढत म्हणाला की जेव्हा मी पहिल्यांदा महादेव बनलो होतो तेव्हा आपल्या आईसाठी तांडव केले होते. राव प्रत्येक भूमिकेत दर्शकांना आकर्षित करतो.
 
रावने सुभाष चंद्र बोसच्या भूमिकेसाठीही तयारी सुरू केली आहे. एकता कपूरचा हा सिनेमा पुढील वर्षापासून शूट होणार आहे. यादरम्यान राव महिन्याच्या शेवटपर्यंत लखनौमध्ये शूटिंग करतील.

वेबदुनिया वर वाचा