बॉलिवूड कलाकारांच्या कमाईचा मुख्य स्रोत हा सिनेमा आणि जाहिराती हा असतो. पण याशिवाय सध्या आणखी एक गोष्ट त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत ठरत आहे. ते म्हणजे त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टचच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करत आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 40-50 लाख रुपये चार्ज करतात. अमिताभ बच्चन सर्वात जास्त त्यांच्या ट्विटरवरून सक्रिय असतात.
अभिनेता शाहरुख खान मागच्या काही काळापासून सिनेमांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या कॅलिफोर्निया व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले होते. शाहरुख एका पोस्टसाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये चार्ज करतो. 'कबीर सिंह' सिनेमानंतर शाहिद कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. अनेक निर्मात्यांची त्याच्यकडे रांग लागली आहे. शाहिद एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 20 ते 30 लाख रुपये चार्ज करतो. नेहा धुपिया प्रेग्रन्सीनंतर सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडिावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे असंख्य चाहते आहेत. ती एका पोस्टसाठी 1.5 लाख रुपये चार्ज करते.