ग्रॅमी आणि ऑस्कर विजेते संगीतकार एआर रेहमान यांचा घटस्फोट आणि मोहिनी डे यांच्याशी कथित संबंध असल्याच्या अफवांबाबत चर्चेचा बाजार तापला आहे. दरम्यान, मोहिनी डे यांची प्रतिक्रिया समोर आली असून तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रत्येकाला गोपनीयतेचे आवाहन केले आहे.
मोहिनीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने एआर रहमान आणि त्याच्याशी संबंधित अफवांवर टीका केली आहे आणि त्यांना पूर्ण मूर्खपणा म्हटले आहे. तिने लिहिले, “मला हल्ली मुलाखतींसाठी अनेक विनंत्या येत आहेत आणि मला ते काय आहे हे चांगलेच माहीत आहे. म्हणूनच मला हे सर्व नाकारावे लागले आहे.”
एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी अलीकडेच त्यांचे २९ वर्ष जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे . सायरा बानोच्या वकिल वंदना शाह यांनी एक निवेदन जारी करून संगीतकारापासून विभक्त झाल्याची घोषणा केली. अशा परिस्थितीत एआर रहमान आणि मोहिनी एकत्र असल्याच्या बातम्या वेगाने पसरू लागल्या.