ताईच एकदा त्यांनी सांगितले की, माझ्या घरची परिस्थिती एवढी नाजूक होती की मी यामुळे दुखी होऊन रेल्वे ट्रॅकवर झोपवून घेतेले आणि डोळे बंद केले. कारण मला मृत्यूला समोर पाहायचे न्हवते. मी डोळे बंद केले तेव्हा माझ्यासमोर घरच्यांचा चेहरा आला. यामुळे मी माझा निर्णय बदलला आणि घरी परत गेलो.
जॉनी लीवर एका कंपनीमध्ये काम करू लागले. ते कंपनीमध्ये कॉमेडी करून सर्वांना हसवायचे. ज्यामुळे त्यांना जॉनी लीवर असे नाव मिळाले. जॉनी लीवर कॉमेडी सोबत मिमिक्री देखील करायचे त्यांनी आपल्या करियरची सुरवात स्टॅंडअप कॉमेडियन केली होती. तसेच ते स्टेज शो देखील करायचे. यादरम्यान त्यांच्यावर सुनील दत्त यांची नजर पडली. त्यांनी जॉनी लीवर यांना चित्रपट 'दर्द का रिश्ता' मध्ये पहिला ब्रेक दिला. त्यानंतर जॉनी लीवर यांनी यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली ते थेट यशाच्या शिखरावर जाऊन पोहचले. त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
तसेच एकदा जॉनी लीवर यांच्यावर तिरंगाचा अपमान करण्याचा आरोप लागला होता. 1999 मध्ये ते एका शो मध्ये गेले होते. त्यांनी तिरंगा बद्दल काहीतरी बोलले. ज्यामुळे लोकांनी नाराज होऊन त्यांच्यावर तिरंगाचा अपमान करण्याचा आरोप लावला होता. ज्यामुळे त्यांना सात दिवसांची जेल झाली होती. तसेच जॉनी लीवर यांनी माफी मागितल्यामुळे ही शिक्षा एक दिवसाची करण्यात आली.