Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने 'पुष्पा 2'वर कारवाई केली आहे. CBFC ने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे.
चित्रपटाचे अंतिम संपादन रिलीज होण्याच्या काही दिवस आधी पूर्ण झाले होते, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी तो सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनकडे पाठवण्यात आला होता. 28 नोव्हेंबर रोजी सेन्सॉर बोर्डाने 'पुष्पा 2' ची तेलुगू आवृत्ती पाहिली आणि त्यातील काही दृश्ये काढून टाकण्याचे निर्देश दिले.
बोर्डाने तीन ठिकाणी r---i हा शब्द काढण्यास सांगितले आहे. यासोबतच Denguddi ,Venkateshwar असे शब्द काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. चित्रपटातून दोन अत्यंत हिंसक दृश्येही काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. एका दृश्यात कापलेला पाय हवेत उडताना दाखवला आहे. दुस-या दृश्यात, नायक त्याच्या हातात एक छिन्नविछिन्न हात धरून आहे, जो ग्राफिक पद्धतीने दाखवला आहे.