बाहुबली साठी बांगलादेशी नागरिक आपल्या देशात

'बाहुबली 2' हा बहुप्रतिक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला आहे.त्याने आजवरचे सर्व रेकोर्ड मोडले असून तो भारतातील सर्वात मोठा चित्रपट झाला आहे. मात्र या चित्रपटाची जादू अजूनही इतर देशात कायम आहे. तर बाहुबलीने कटप्पाला का मारलं याचं उत्तर मिळत आहे.
 
या सिनेमाचं क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. याचा अंदाज तर बॉक्स ऑफीसचे आकडे पाहिल्यानंतर लक्षात येतच. देशातील आघाडीची वृत्त संस्था असलेल्या इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंगळवारी 'बाहुबली 2' पाहण्यासाठी जवळपास 40 बांगलादेशी चाहत्यांनी चक्क चार्टर प्लेनने प्रवास करून कोलकाता गाठलं. या सिनेमाची 2 वर्षांपासून वाट पोहोत होतो असं यातील एकाने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे आपल्या देशातील चित्रपट इतर देशात किती प्रसिद्ध आहेत हे स्पष्ट होतय.

वेबदुनिया वर वाचा