आयुष्यमान खुरानाद्वारा अभिनीत अनुभव सिन्हा यांचा आगामी अनेक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 17 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. अनेक य चित्रपटातून अनुभव आणि आयुष्यमान यांची हिट जोडी पुन्हा वापसी करत आहे. विशेष करून अभिनेता आणि दिग्दर्शक यांची ही जोडी प्रसिद्ध असल्याने चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलेला आयुष्यमानचा जोशुआ' चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी हॉलिवूडमधील अॅक्शन डायरेक्टर स्टीफन रिक्टर यांच्यावर चित्रपटातील अॅरक्शन सीनची जबाबदारी सोपविली आहे.