सोनाक्षीचे थरारक स्टंट्स

IFM
बॉलीवूडची मादक बाला सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी 'सन ऑफ सरदार'या चित्रपटात थरारक स्टंट करताना दिसेल. खुद्द सोना‍क्षीनेच माध्यामांशी बोलताना ही माहिती दिली. सोनाक्षीने या चित्रपटात चक्क मोटारसायकलवर एखाद्या अ‍ॅक्शन हिरोला लाजवतील असे स्टंट साकरले आहेत. हे सर्व स्टंट करण्यासाठी मला खूप प्राशिक्षण घ्यावे लागल्याचे ती म्हणाली. आतापर्यंतच्या माझ्या चित्रपटांच्या कारकिर्दीतील हे पहिलेच स्टंट आहेत. हे स्टंट करताना माझ्या आईने पाहिले असते तर तीसुद्धा घाबरली असती.

दबंग आणि जोकरनंतर सोनाक्षी पुन्हा एकदा गावातील खेडवळ तरुणीची भूमिका करत आहे, पर या भूमिकेमुळे मी एकाच प्रतिमेत अडकणार नसल्याचेही तिने सांगितले. आजकलच्या तरुण पिढीला मसाला चित्रपट अधिक आवडतात. त्यामुळे 'सन ऑफ सरदार'हा चित्रपट पूर्णपणे मसाला फिल्म असल्याची ती म्हणाली. सलमान, अक्षय आणि अजय देवगर यांच्यासारख्या प्रस्थापित अभिनेत्यांसोबत अभिनय केल्यानंतर सोनाक्षी आता नव्या दमाच्या अभिनेत्यांसोबत काम करतना दिसेल. अनुराग कश्यपच्या आगामी 'लुटेरा' या चित्रपटात ती रणवीर सिंह सोबत काम करणार आहे. तसेच वन्स अपॉनच्या सिक्वेलमध्ये ती इमरान खानसोबत काम करताना दिसेल. सध्या सन ऑफ सरदारच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणार्‍या सोनाक्षीला अनेक नामां‍‍कित निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांसाठी गळ घातल्याचे बॉलीवूड सूत्रांकडून कळते. यामुळे सोनाक्षीचा भाव चांगलाच वधारला आहे.

वेबदुनिया वर वाचा