राधिका आपटेच्या को-स्टारचा खुलासा

मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (12:29 IST)
प्रसिद्धीझोतात येण्यासाठी अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. काही कलाकार याबाबत उघडपणे बोलतात तर काहीजण अशा गोष्टी गुप्त ठेवणेच योग्य समजतात. टेलिव्हिजन क्षेत्रातून प्रसिद्धीस आलेली आणि आता बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिलाही कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते.
 
हेट स्टोरी 2 नंतर आता सुरवीन चावला लीना यादव दिग्दर्शित ‘पाच्र्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री राधिका आपटे आणि सुरवीन चावला यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. शिवाय ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअँलिटी शोमध्येही ती दिसत आहे. 
 
बॉलिवूडमधील सुरवीनचा प्रवास इतका सहजासहजी झालेला नाही. एका मुलाखतीत सुरवीनने धक्कादायक खुलासा केला आहे. एका सिनेमात काम मिळवण्यासाठी दिग्दर्शकाने तिच्यासमोर एक रात्र काढण्याची ऑफर ठेवली होती.
 

वेबदुनिया वर वाचा