केतन मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी कंगनाला घोडेस्वारी, तलवारबाजीसारख्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत. तर ब्रिटिश अधिकारी जनरल ह्युज रोझच्या भूमिकेसाठी हॉलिवूड अभिनेते ह्युज ग्रॅण्ट यांना विचारणा करण्यात आल्याचेही समजत आहे.
झाशीमध्ये 1858 साली ब्रिटिश राजवटीविरोधात झालेल्या उठावाचे राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व केले होते. दिग्दर्शक केतन मेहता यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला असून हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या ‘मंगल पांडे’ या चित्रपटाचा पुढचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.