या बेटावर नोव्हेंबरपासून आतापर्यंत रात्र होती आणि आता तिथे सकाळ झाली आहे. स्लेवबार्ड बेटावर फेब्रवारीच्या महिन्यात "ट्विलाइट सीजन'असतो. म्हणजे या बेट समूहावर जवलपास एक महिनाभर ना दिवस असतो ना रात्र. या कालावघीत तिथल्या आकाशाचा रंग संपूर्ण महिनाभर सतत बदलत असतो. त्यामुळे असे वाटते तिथे कधीही सूर्योदय होऊ शकतो, परंतु सुर्याचे दर्शन काही होत नाही. निसर्गाचा हा अद्भुत व आट चमत्कार पाहायासाठी तिथे मोठ्या संखयेने पर्यटक येत असतात. यंदाही अनेकांनी तिथे हजेरी लावली आहे. जवळपास सव्वा महिन्याच्या लपाछपीनंतर 6 मार्चला तिथे सूर्य उगवेल. स्लेवबार्ड बेटावर तीन नाही तर पाच ऋतू असतात. वसंत, उन्हाळा व शरद ऋतुव्यतिरिक्त तिथे हिवाळ्याचे दोन मोसम असतात. पर्यटकांसाठी तिथे एका स्पर्धेचेही आयोजन केले जाते. स्लेवबार्ड बेटावरील दहा डोंगरावर एक-एक नोंदवही ठेवली जाते. ८ मार्चला सूर्योदय होईल त्या दिवशी तो कुणी व्यक्ती डोंगरावर जाऊन सगळ्यात आधी तिथल्या नोंदवहीत आपले नाव लिहितो. त्याला बक्षीस म्हणुन संपूर्ण बेटाची फुकटात सफर करण्याची संधी मिळते. या कालावधीत तिथे पर्यंटकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.