अमृतसरमध्ये पाहण्याजोगे

शीखांचे चवथे गुरु रामदास यांनी 16व्या शतकात एका सरोवराकाठी बस्तान बसवले. सरोवराच्या पाण्यात अद्भुत शक्ती होती. यावरून या सरोवराच्या काठी वसलेल्या शहराचे नाव अमृत सर (अमृताचे सरोवर) असे पडले आहे.

गुरु रामदास यांच्या मुलाने या सरोवराच्या मध्यभागी एक मंदिर बांधले तेच सुवर्ण मंदिर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. येथे एप्रिल महिन्यात बैसाखी नामक पर्व मोठ्या जल्लोषात साजरे केले जाते.

सुवर्ण मंदिर
जगातील शीख बांधवाचे हे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला हरी म‍ंदिरही म्हटले जाते. मंदिराच्या कळसाला शुद्ध सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे.

 
WD

दुर्गियाना मंदिर

हे हिंदु बांधवाचे धार्मिक स्थळ असून मंदिराच्या कळसाला सोने व चांदी मुलामा लावण्यात आला आहे. जलियनवाला बाग सन् 1919 मध्ये ब्रिटिश सरकारचा उद्दाम अधिकारी जनरल डायरने येथे सुमारे 2000 भारतियांना गोळ्या घालून ठार केले होते. या दु:खद घटनेचे स्मरण होण्यासाठी येथे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.

WD



तरणतार

अमृतसरपासून 22 कि.मी. अंतरावर तरणतारण नावाचा एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात अनेक प्रकारचे आजार दूर करण्याची औषधी शक्ती असल्याचे मानले जाते.

बाबा अटल राय स्तं

गुरू हरगोविंदसिंग यांच्या नऊ वर्षीय मुलाचे हुतात्मा स्मारक आहे.
PR

रामतीर्थ

रामतीर्थ हे प्रभु रामचंद्र यांची मुले लव व कुश यांचे जन्मस्थळ मानले जाते. येथील विमानतळ शहरापासून 11 कि.मी. अंतरावर आहे.

PR

वेबदुनिया वर वाचा