संजय निरूपम : प्रचारात सहभागी होणार नाही

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (10:58 IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर संताप व्यक्त केला आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
निरुपम यांनी एक ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  
 
काँग्रेसमधील खदखद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बाहेर आली आहे. पक्षाला आता माझी गरज वाटत नाहीये, असं ट्वीट करत संजय निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
मी सुचवलेल्या नावांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं असं म्हणत कोणत्याही प्रचारात सहभागी न होण्याचा पवित्रा निरुपमांनी घेतला आहे.
 
ज्या प्रमाणे पक्षश्रेष्ठी माझ्याशी वागत आहेत, ते पाहता पक्ष सोडण्याची वेळ फार दूर आहे, असं वाटत नाही, असं सूचक विधानही निरुपम यांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती