कोरोना मुंबई: लॉकडाऊन आणि रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी मुंबई पोलीसने जारी केले हे 5 नियम
मंगळवार, 5 मे 2020 (14:58 IST)
मुंबईतील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.भारत सरकारनं मुंबईचा समावेश रेड झोनमध्ये केल्यामुळे काही दिशानिर्देश नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असं मुंबई पोलीस आयुक्तालयानं जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
4 ते 17 मे या कालावधीदरम्यान या नियमांचं पालन करावं लागणार आहे. मुंबईत सध्या राज्यात सर्वाधिक केसेस आहेत.
या पत्रात सांगितलेली नियमावली पुढीलप्रमाणे-
1. एकापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. तसंच धार्मिक स्थळांवर लोकांना एकत्र जमता येणार नाही.
2. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत फिरण्यास परवानगी नाही.
3. सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंतच्या हालचाली लॉकडाऊनच्या नियमानुसार करण्यात याव्यात.
5. कुणीही व्यक्ती या नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास IPCच्या 188 व्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार.
राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 13 हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. तसंच मुंबई आणि पुणे महानगरचा भाग वगळता नागपूर, मालेगाव, औरंगाबाद आणि यवतमाळमध्येही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने रेड झोन जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील रेड झोन - मुंबई, पुणे, ठाणे (जिल्हा), नाशिक (शहर-ग्रामीण), मालेगाव, पालघर, नागपूर (शहर-ग्रामीण), सोलापूर (शहर-ग्रामीण), यवतमाळ, औरंगाबाद (शहर-ग्रामीण), सातारा, धुळे (शहर-ग्रामीण), अकोला (शहर-ग्रामीण), जळगाव (शहर-ग्रामीण).