अयोध्येच्या हनुमानगढीमधील वसलेले हनुमान, सुलतानाला दिला आशीर्वाद...

बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (11:37 IST)
अयोध्याच्या सरयू नदीच्या तीरे उजव्या बाजूस उंच गढावर वसलेले हनुमानगढी हे सर्वात प्राचीन देऊळ मानले गेले आहे. येथे पोहोचण्यासाठी जवळ-जवळ 76 पायऱ्या चढाव्या लागतात. इथे स्थापित असलेल्या मारुतीची मूर्ती फक्त 6 इंच लांबीची असून, ती नेहमीच फुलांनी सजलेली असते. हनुमानगढी हे प्रत्यक्षात एक गुहेचे देऊळ आहे.
 
अशी आख्यायिका आहे की लंका जिंकल्यानंतर मारुती एका गुहेत राहायचे आणि रामजन्मस्थळी आणि रामकोटचे संरक्षण करायचे. याला मारुतीचे घर देखील म्हटले आहेत. या देऊळाच्या संकुलाच्या चारही कोपऱ्यात वर्तुळाकार गड आहे. देऊळाच्या आवारात आई अंजनी आणि बाळ हनुमानाची मूर्ती आहे ज्यामध्ये हनुमान किंवा मारुती आपल्या आई अंजनीच्या मांडीत बाळ रूपात आराम करत आहेत. 
 
या देऊळाच्या जीर्णोद्धाराच्या मागील एक कथा आहे. सुल्तान मंसूर अली लखनौ आणि फैजाबादचे प्रशासक असे. एकदा सुलतानाचा मुलगा आजारी झाला. वैद्य आणि चिकित्सक देखील हतबळ झाल्यावर, सुलतानाने परिस्थितीशी कंटाळून आई अंजनाच्या पायी डोकं टेकले. त्याने मारुतीस विनवणी केली आणि चमत्कारच घडले की त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला. त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य झाले.
 
सुलतानाने आनंदित होऊन हनुमानगढ आणि चिंचेच्या वनाच्या माध्यमातून आपल्या विश्वास आणि श्रद्धेला मूर्तरूप देण्यासाठी या मोडकीस आलेल्या देऊळाला एक अफाट मोठं रूप दिले आणि 52 बिघा जमीन हनुमानगढी आणि चिंचेच्या वनासाठी उपलब्ध करून दिली. 300 वर्षांपूर्वी संत अभयरामदासच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली हे भव्य बांधकाम संपूर्ण झाले. संत अभयरामदास निर्वाणी आखाड्याचे शिष्य होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती