वृश्चिक
काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत.