तूळ
एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड . सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे.