राशिभविष्य

कन्या
उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल.