वृषभ
तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही.