
मेष
थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.