
मिथुन
कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.