
धनु
प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपण आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. मनस्वास्थ लाभेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. अधिकारावर असणार्या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावरता येईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. अनावश्यक खर्च उद्भवतील.