
सिंह
पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वाहन-वास्तूचे योग येतील. प्रतिष्ठीत व्यक्तीचे घराला पाय लागतील.