
कर्क
प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले आवडते छंद पासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल.जोडीदाराची पदोन्नती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग येतील.