
मिथुन
कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या अनिश्चितता जाणवेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नांवलौकिक मिळेल. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.