
मकर
वरिष्ठांच्या सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.