राशिभविष्य

धनु
सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. इतरांकडून येणे असलेला पैसा हाती येण्यास विलंब व अडथळे निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरू शकेल. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. क्रीडा क्षेत्रात नवीन डावपेचाचा केलेला प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावरच राहील व बक्षीसपात्र स्थिती कायम स्थितीतच राहील.