राशिभविष्य

वृश्चिक
सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्गाकडून अपेक्षित स्वरूपाचे सहकार्य लाभेल. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून यथायोग व उचित मानसन्मान सोहळा आयोजित केला जाईल. सर्वत्र अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात कौटुंबिक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. काही बाबतीत दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साहवर्धक स्थिती राहू शकेल.