राशिभविष्य

तूळ
सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार व वार्ता हाती येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात संततीबाबत असणारी चिंता मिटेल व आर्थिक आवक विविध मार्गावरून राहील. त्यामुळे आर्थिक टंचाई जाणवणार नाही व हातात पैसा खेळताच राहू शकेल